या ब्लॉग वर भेटतील आपणा सर्वांना माझे मित्र-मैत्रिणी! भेटतील म्हणजे त्या सर्वांची तुमच्याशी ओळख होईल. आणि ओळख होण्याचं माध्यम असेल त्या सगळ्यांवर त्यांच्या वाढदिवशी मी केलेल्या कविता! मी काही कवयित्री वगैरे नाही. फ़क्त यमक जुळवण्याचा एक प्रयत्न !
मला मजेत जगायला आवडते. पण मजेत जगणे म्हणजे काय ?
मजेत जगणे आपल्या आनंदाची जबाबदारी स्वीकारणे.
आयुष्याचा कोरा Canvaas असतो समोर, त्यात मनाजोगते रंग भरणे
मजेत जगणे म्हणजे स्वप्ने पाहणे . . . ती प्रत्यक्षात उतरवणे.
मजेत जगणे म्हणजे नित्य बदलत्या आयुष्याचे स्वागत करणे.
अपयशातून जाणते होणे, संकटातून सुदृढ़ होणे. दु:खातून प्रगल्भ होणे.
रागाचा राग, द्वेषाचा द्वेष न करता त्यातून हलकेच पार होणे
मजेत जगणे म्हणजे आपले आयुष्य आपण घड़वणे आणि आयुष्याचे रुण चुकते करणे!
प्रामाणिक पणे स्वत:चा उत्कर्ष साधता साधता इतराचीही आयुष्ये उजळवणे
जियो तो ऐसे जियो, जैसे सब तुम्हारा है,
मरो तो ऐसे की, जैसे तुम्हारा कुछ भी नही!
Courtesy: The book ' मजेत जगावं कसं '